Type Here to Get Search Results !

वसुलीबाज महिला पोलिस अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन निलंबित करा

वणी/ प्रतिनिधी: मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि आर्थिक उलाढालीसाठी वणी शहर यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. कोळसा वाहतूक आणि मोठी बाजार पेठ असल्या कारणाने शहराबाहेरून अनेक मालवाहतूक गाड्या शहर परिसरात तर प्रवासी गाड्या ज्यात क्रुझर, टाटा मजिक, बोलेरो, सुमो यासारख्या गाड्या शहरात प्रवासी घेऊन येतात. सदर वाहन धारकांकडे वाहनाचे पूर्ण कागदपत्रे तर प्रवासी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जातात. तर प्रवासी वाहनाचे थांबे सुद्धा बस स्थानक परिसरात आणि वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या ठिकाणी आहेत. सदर सर्व वाहनावर कारवाई होऊन त्यांना दंड थोटावने अपेक्षित आहे. मात्र वणी येथील वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिता वाघमारे या सर्व वाहनधारकाकडून हप्ता वसुली करून यांना पाठबळ देतात. असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुकी सेनेचें राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी केला. तर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करुन निलंबित करण्यात यावें अशी मागणी काल दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे केली. 

       सदर पठाणी वसुलीसाठी वाघमारे यांनी एक पोलीस शिपाई "हस्तक" म्हणून नेमला आहे.  हस्तक आपले कार्यालयीन काम सोडून अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनधारका कडून वसुलीत व्यस्त असतो. तर या वसुलीत वाहणानुसार वसुलीचे दर ठरवून देण्यात आले आहे. या मध्ये ३ प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला ९ ते १० प्रवासी ने आन करण्यासाठी ३०० रुपये हप्ता तर मोठ्या गाड्याना ५०० रुपयाचा दर आकारण्यात येतो. तर ट्रक व इतर मालवाहतूक वाहनाकडून २००० ते ३००० हजार रुपये आठवड्याला आकारल्या जातात. अवैद्य वाहतुकीला पाठबळ देऊन होणारी वसुली ही सरळ वाघमारे यांच्या खिशात जाते. तर यातील काही अल्पसा हिस्सा हस्तक च्या आणि सोबतच्या सहकाऱ्याना दिला जातो. अशी माहिती सुध्दा सदर निवेदनातून देण्यात आली.

           वणी, मारेगाव, झरी जामणी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खदानी, लाईम स्टोन, डोलामाईटस, रेती घाट, सिमेंट कंपन्या आहेत. त्यामुळेव दिवसाकाठी या खदानीत आणि कंपन्यात कच्या व पक्क्या मालाची ने - आन करणारे शेकडो ट्रक या भागात येत असतात. यातील सर्व ट्रक चालकांना कायद्याचा आणि वर्दीचा धाक दाखवून त्यांच्याकडून महिन्याकाठी प्रत्येकी २ ते ३ हजार रुपये वसुल केल्या जाते. यासंबधी अनेक वाहनाधारकांनी आमच्या कडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या. या सर्व प्रकारामुळे व्यवसायिक व वाहणधारक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रस्त आहेत. गावातील, बाजारपेठेतील व मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रित करून सर्व सामान्यांना सेवा देण्याचे काम असतांना वाहतूक शाखा मात्र पैशाच्या वसुलीत व्यस्त असते. तर शहरातील आणि शहराबाहेर ठरविलेल्या जागेवर कोणताही कर्मचारी उभा राहून आपल कर्त्यव्य पार पडताना दिसत नाही. जर कधी राहिलाचतरी तो थेट बेकायदेशीर रीत्या वाहणधारकांना अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी करतो. सदर मागणीतून वसूल झालेले पैसे हे शासन दरबारी जमा न होता ती त्यांची वैयक्तिक कमाई असते. परिणामी वाहतूक शाखेच्या या सर्व कारभारामुळे गावातील वाहतूक आणि पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे. रोड रोमियोंचे प्रमाण वाढले. वाहतूक शाखेच्या या सर्व मस्तवाल आणि अनियंत्रित कामामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.

              हा सर्व प्रकार गंभीर असून महिन्याकाठी लाखो रुपयाची अवैद्य वसुली करणाऱ्या भ्रष्ट वाहतूक अधिकाऱ्यामुळे शासन, प्रशासन व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून  हा प्रकार थांबवावा. व या वसुलीतील मुख्य वसुलीबाज भ्रष्ट अधिकारी स.पो.नि. सीता वाघमारे यांच्यासह वसुलीतील हस्तक असणाऱ्या पोलीस शिपाई  यांच्या संपत्तीची चौकशी करून यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे व यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे व याठिकाणी एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला नियुक्त करून वणी शहर व परीसातील वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती यांना मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad