Type Here to Get Search Results !

आयुष ठाकरे यांनी जन्मदिनी सावित्रीबाई फुले वाचनालयास दिली दर्जेदार पुस्तकांची भेट

वणी, शुभम कडू : 

                              वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित्यांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आयुष ठाकरे यांनी वणीतील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक  वाचनालयाला काही दर्जेदार पुस्तके भेट दिली. 

    आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे, अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे, ही गरज ओळखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना उपतालुका प्रमुख आयुष ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाला पुस्तके भेट देत आहोत, असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. वाढदिवसाच्या माध्यमातून आनंद द्विगुणित करण्यासोबत समाजातील वाचनाची गरज ओळखून पुस्तकरूपी ज्ञानभेट देऊन एक नवा आदर्श आयुष ठाकरे यांनी निर्माण केला आहे, असे वाचनालयाचे संचालक प्रा. अनिलकुमार टोंगे यांनी आयुष ठाकरे यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना बोलत होते.
         या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर रासेकर तर प्रमुख पाहुणे समाजसेवक मंगेश रासेकर, संजय चिंचोलकर होते. यावेळी आर्यन रासेकर, मिलिंद मालेकर आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल शुभम कडू, सहाय्यक प्रज्वल गोहोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. 


👉👉 वणीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मशाल मोर्चा 👇👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad