वणी/प्रतिनिधी :
शहरातील सुतारपुरा येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी शनिवारी दिनांक ०३ जानेवारीला रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश विजय राखुंडे हा प्लबिंग चे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गणेश हा आई व पत्नी सह कुटुंबात राहत होता. पत्नी गर्भवती असल्याने माहेरी जाऊन होती. नेहमीप्रमाणे गणेश हा रात्री त्याच्या खोलीमध्ये झोपायला गेला, गणेशची आई सकाळी खोली मध्ये गेला असता गणेश त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या