Type Here to Get Search Results !

मार्कडेय पोदार लर्न स्कुल मंदर वणी मध्ये लक्ष वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वणी, शुभम कडू :
                         मार्कडेय पोदार लर्न स्कुल मंदर वणी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजिवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी मारेगाव झरी विधानसभा क्षेत्र, प्रमुख पाहुणे म्हणुन मा. नितीन हिंगोले सर उपविभागीय दंडाधिकारी वणी, मा. रमेश आर सुकुरवार सर उपाध्यक्ष श्री मार्कडेय शिक्षण संस्था वणी, मा. धनंजय मुक्तेवार सर, उपाध्यक्ष श्री मार्कडेय शिक्षण संस्था वणी, मा. राहुल आर सुंकुरवार, सचिव श्री. मार्कडेय शिक्षण संस्था वणी, मा. सी. ललिताताई सजिवरेड्डी बोदकुरवार समाजसेविका महिला संघ वणी, मा.सौ. वर्षाताई डी. मुक्तेवार सदस्या श्री मार्कडेय शिक्षण संस्था वणी, मा. कुणाल आर सुकरवार शाळेचे मुख्याध्यापक, मा. आमिन नुरानी सर, मा. सौ कविलाताई आर सुकुरवार, मा. प्राचीताई आर सुकुरवार, मा. सौ. पुनमताई आर सुकुरवार कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून माता सरस्वतीच्या प्रतिमेला हारअर्पण करून करण्यात आले. अध्यक्षाचे स्वागत संस्थाध्यक्ष मा. रमेशजी वि. सुकुरवार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुने यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुन करण्यात आले.

मुख्याध्यापक यांनी शाळेविषयी वर्षभर झालेल्या शैक्षणिक सांस्कृतिक कला विषयी सविस्तर अहवाल व्हिडीओ फित दाखवुन देण्यात आला. संस्थाअध्यक्ष यांनी शाळेच्या प्रगती तसेच शैक्षणिक सामाजिक कला उपक्रमाबाचत विध्यार्थ्यांना अधिकाअधिक सहभाग नोंदविण्याकरीता भाग पाडणे या मुळे त्यांच्या कला गुणांना वाव मिळेल. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होईल हे संस्थेचे ध्येय आहे. हा प्रसंग एक लक्ष म्हणुन साजरा होइल त्याच बरोबर विध्यार्थ्यांसोबतच माता पालकांनी सुध्दा नृत्य कलेत सहभाग नादेविला हे एक विशेष होते यामुळे पाल्याच्या चेह-यावरचे हाव-भाव त्यांना प्रोत्साहीत करणारे होते. हा प्रसंग लक्ष वार्षीक स्नेह संमलेन 2024 म्हणुन साजरा करण्यात येत आहे. विध्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला गुणांचे नृत्य कला व्दारे तसेच माई सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्यात स्त्रि शिक्षणाचे महत्त्व या विषयावर नाटक सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी विध्यार्थी समस्त पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते. विध्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण अलौकिक होते.

                कार्यक्रमाचे संचालन गुडीया पाठक मॅम निशा रियाज मॅम यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक आमिन नुरानी सर यानी मानले. कार्यक्रम यशस्वितेकरीता सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृद यानी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad