वणी/ प्रतिनिधी :
परसोडा येथे पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भेट देऊन कथेचा लाभ घेतला व पंडित मिश्रा यांचे दर्शन घेऊन आयोजक राजु जयस्वाल कुटुंबास शुभेच्छा दिल्या. तर व्यासपीठावरून हिंदू धर्म कार्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी अग्रेसर राहत आली आणि यापुढें ही राहणार अस वक्तव्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या उपस्थिती बद्दल पंडित मिश्रा यांनी हार, तीर्थप्रसाद आणि पुष्पहार देतं त्यांचें स्वागत केले. तर कथा समाप्ती नंतर शर्मिला ठाकरे आणि मनसेच्या राज्य सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दुपारी ३ वाजता शर्मिला ठाकरे यांचे नांदेपेरा चौकात पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी यांनी देखील या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून शिवपुराण कथेचा लाभ घेऊन मिश्रा यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी देखील उपस्थित राहून कथेचा लाभ घेतला. हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून अक्षरशः शर्मिला ठाकरे भारावून गेल्या आणि त्यांनी या उत्कृष्ट नियोजनाबाबत कौतुक करून अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मनसेने नेहमीच हिंदू धर्म कार्यात अग्रेसर राहून काम केलं आहे. पुढील काळात देखील हिंदू धर्माचे कार्य जनमानसात रुजवण्यासाठी आणि एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अजून काम करणार असल्याचं मत यावेळी व्यक्त केले.
मनसेचा गड असलेल्या वणी मतदारसंघात शर्मिला ठाकरे पहिल्यांदाच आल्याने त्यांचे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात मतदारसंघांतील हजारो महिला आणि नागरिकांच्या वतीने शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय, नांदेपेरा रोड येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. तर पुढील कार्यक्रमास परसोडा येथील उपस्थिती नंतर मनसे नेते राजु उंबरकर यांच्या शिवमुद्रा या जनसंपर्क कार्यालयं हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांचें भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. तर झरी तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य करत शर्मिला यांचे स्वागत केले. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी शर्मिला ठाकरे यांनी संवाद साधला. वणीचा पुढील आमदार मनसेचा असेल असा शब्द घेण्यासाठी मी वणीत आले आणि आता यापुढें राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ मी वणीत तुमच्या सोबत असणार असे उदगार शर्मिला ठाकरे यांनी काढले. शर्मिला ठाकरे यांच्या स्वागताने मनसेसैनिकांमध्ये उत्साह पहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी वणी मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेत सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. वणी मध्ये मनसेच्या माध्यमातून युवक, महिला, बेरोजगारांसाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. या उपक्रमाची माहिती पक्षनेते राजू उंबरकर यांनी शर्मिला ठाकरे यांना दिली.
निवडणुकीच्या तोंडावर आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्ते, महिला आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात हे बळ मनसेला फायदेशीर ठरणार असल्याचे आता दिसून येत आहे.
यावेळी मतदारसंघांतील सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थितीत होतें.
वणीचां पुढचा आमदार मनसेचा राजु असेल
"वणी मतदारसंघाने राज ठाकरे आणि मनसेवर नेहमीचप्रेम केलेले आहे. राज्यातील पहिली नगरपरिषद ही वणीची असुन अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मनसेला चांगला प्रतिसाद मिळाला असुन यामाध्यमातून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि अनेकशा ग्रामपंचायती मनसेच्या ताब्यात आल्या. तर मागील सर्व विधानसभा निवडणुकात मनसेला मतदारांनी चांगली पसंती दाखवली होती आता २०२४ ला इथला आमदार मनसेचा असुन तो बहुमान आमच्या राजु उंबरकर यांचां असणार आहे अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली."
मुलीचे आनंदी नामकारण
वणी मतदारसंघांत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर निवडणुक गेलेल्या अलका त्रिंबके ( टेकाम) आणि नगर परिषदेचा माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके यांना दोन महिन्या पूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. आज या दांपत्याने आपलीं कन्या शर्मिला ठाकरे यांच्या हातात देऊन मुलीचे नामकरण करण्याचा आग्रह केला. तर मुलीचा हसरा चेहरा पाहून हीचे नाव "आनंदी" असे ठेवून मुलीस आशीर्वाद दिले..
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या