वणी/प्रतिनिधी : स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये दिनांक २० जानेवारी रोजी किड्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलचे उद्घाटन संस्थाध्यक्ष प्रदिप बोनगिरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगिरवार, कौशल हलवादीया, खुशी हलवादीया व मुख्याध्यापक प्रविणकुमार दुबे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या 'फन फेअर' मध्ये शाळेतील सुमारे १०० विद्यार्थीनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. किड्स कार्निवलमध्ये अनेक स्पर्धात्मक खेळ आणि खाद्यपदार्थांची रेलचेल होती. जवळपास ५०० लोकांनी या कार्निवलला उपस्थित राहून उत्सफूर्त प्रतिसाद नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे विद्यार्थ्यांचे उद्बोधन करताना प्रवीणकुमार दुबे म्हणाले की, विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनातील मनावर असलेला अभ्यासक्रमाचा ताण तणाव दूर होऊन विरंगुळा मिळावा, अनुभवाद्वारे व्यवहारीक ज्ञान मिळावे तसेच त्यांच्यातील अंगीकृत सुप्त गुणांना वाव देता यावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशबू तोडसाम तसेच आभार प्रदर्शन प्रफुल महातळे यांनी केले.
कार्यक्रमाला मधुर संगीतमय स्पर्श देण्यात रेशमा दोडेवार व दीपक ठेंगणे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी आयोजनाकरिता विनायक किटे, शैलेंद्र धोटे, नागेश कडूकर, भूषण सोनवणे, सागर देवगडे, कपिल ताटेवार, अश्मिर भगत, प्रियांका पांडे, नुरसायमा खान, पूजा पांडे, माधवी लाभे, सविता राजुरकर, रिना, सोनू, प्रियांका कंकुटला, पल्लवी वांढरे, सोनल दुबे, पलक शिरभाते, मुस्कान शेख, आलिया शेख, स्मिता काळे, ममता, नुसरत, सायली लडके, मेघा ठेंगणे व स्नेहा गौरकर आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या