वणी, शुभम कडू :
प्रभु श्री रामनवमी जन्म उत्सव शोभायात्रा समिती वणी च्या वतिने श्रीराम मंदिर अयोध्या, प्राणप्रतिष्ठा निमीत्त्याने 'श्रीराम गीत यज्ञ' कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता शहरातील मध्यभागी असलेल्या जुन्या स्टेट बँक जवळील श्री राम मंदिर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात निवडक गीत रामायण गदिमा रचित, सुधिर फडके यांनी स्वर बद्द केलेल्या हिंदी, मराठी प्रभु रामचंद्रांच्या सुमधुर गीतांचा नित्यनुतन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभु श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती, वणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, श्रीराम भक्त महाआरती मंडळ वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या