वणी/प्रतिनिधी : ज्योत्स्ना अय्या आत्राम असे नाव असून पेंढरी मारेगाव तालुक्यातील असून दि. २० जानेवारी ला रासा शेत शिवारात गळफास लावून आत्महत्या केली. ही मुलगी वणी तालुक्यातील रासा या गावात परिवारासह रहायची. ती अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे.
ह्या अल्पवयीन मुलीला खर्र्या का बरं खाते असे म्हणून आई ने ओरडल्याने या दोघींमध्ये वाद झाला. याचा राग डोक्यात घालून शौचास जात आहेत असे सांगून ती बराच वेळ झाल्याने घरी आली नसल्याने तिला शोधत असताना झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेला अवस्थेत दिसली. त्यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. घटनेची वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली असून, आज सकाळी दि. २१ जानेवारी रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या