मुकुटबन/प्रतिनिधी : झरी-जामणी -मुकुटबन येथिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह येथे दि.२१ जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचा झरी-जामणी युवक तालुका प्रमुख पदी मा.श्री.सागर भाऊ इंगोले यांची निवड करण्यात आली.
तसेच प्रहार कामगार संघटनेच्या तालुकाप्रमुख पदी मा.श्री.राजू भाऊ गागरे यांची निवड करण्यात आली. यावेळी झरी-जामनी तालुकाप्रमुख संतोष भाऊ सेंगर, मारेगाव तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे उपस्थित होते. नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या सेवा,कर्म,निष्ठा,त्याग, शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी यांच्या प्रती आदरता,विचारांचा प्रसार-प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून आपली निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



