वणी : कळमना खुर्द येथील शेतात असलेल्या बंड्यातून सोयाबीन चोरी गेल्याची तक्रार पोलिसात दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ च्या पथकाने समांतर तपास करीत चार चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
तालुक्यातील वांजरी येथील विलास दत्तूजी देऊळकर ५०, यांचे कळमना खुर्द शेतशिवारात शेत आहे. शेतात असलेल्या टिनाच्या बंड्यात सोयाबीन साठवून होते. विलास शुक्रवारी दुपारी चार वाजताचे सुमारास शेतात गेले असता बंड्यात साठवून ठेवलेले ६४ हजार पाचशे रुपये किमतीचे १५ क्विंटल सोयाबीन चोरी झाल्याचे दिसून आले. विलास देऊळकर यांनी सदर घटनेची शनिवारी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द वणी पोलिसांनी भा दं वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद केला होता. शेतमालाची चोरी असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पथकाला सदरचा गुन्हा उघड होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने वणी येथे गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हेगारांचा मागोवा घेत असतांना फिर्यादी विलास दत्तुजी देउळकर यांचे शेतातील सालगडी अनिल चव्हाण रा. वांजरी यानेच शेतातील सोयाबीन चोरले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यावरुन पथकाने वांजरी येथे जावुन देऊळकर यांचे शेतातील सालगडी अनिल नामदेव चव्हाण ५०, रा. बेघर वांजरी याला ताब्यात घेवुन त्याचेकडे कोशल्यपुर्वक तपास केला असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी त्याच गावातील जयेश देऊळकर, रोशन देऊळकर, व अतुल ढवस यांचे मदतीने विलास दत्तुनी देऊळकर यांचे शेतातील बंड्यामधून अंदाजे २९ कट्टे सोयाबीन चोरले असल्याची व ते सोयाबीन त्याचे तिन साथीदारांनी मोटर सायकलवरुन नेवुन वणी येथे विकले असल्याची कबुली दिली त्यावरुन आरोपी अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, रोशन तुळशीराम देऊळकर वय ३० वर्षे, जयेश शंकर देऊळकर वय २० वर्षे, अतुल उर्फ विवेक अवधुत ढवस वय २९ वर्ष, सर्व रा. वांजरी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सोयाबीन मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरलेले सोयाबिन चिखलगाव (वणी) येथील विजय गुलाबराव निते वय ४८ वर्षे व चंद्रशेखर पांडुरंग देठे वय ३९ वर्षे, या वेगवेगळ्या दुकानदारांना विक्री केले असल्याचे दिसुन आले. सदर दुकानदारांकडून अनुक्रमे १९ व १० असे २९ कट्टे अंदाजे १५ क्विटल सोयाबीन किंमत ६४, हजार पाचशे रुपयांचा शेतमाल जप्त करुन आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल किमंत ७०, हजार रुपये असा एकुण एक लाख, ३४ हजार, पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीना पुढील कार्यवाही करिता वणी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्था.गु.शा.यवतमाळ. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी अतुल मोहनकर, सपोनी अमोल मुडे, पोलिस अंमलदार सुधीर खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी नरेश राऊत सर्व स्था.गु.शा.यवतमाळ यांनी यशस्वीपणे पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या