वणी/प्रतिनिधी (शुभम कडू) : वणी शहरालगात मुख्यमार्गाच्या चौक परिसरात दिवसारात्री अपघात सुरू आहे. काही चौकात अंधार असल्याने वणी-वरोरा रोड संविधान चौक येथे हायमॅक्स स्टीटलाईट ची अत्यंत गरज आहे. तसेच ब्राम्हणी फाटा टी-पाईंट, चारगाव चौकी टी-पॉईंट परिसर व मुकुटबन रोड घोंसा टी-पॉईंट शहिद चौक या ठिकाणी हायमॅक्स स्टीटलाईट आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्फत लावण्यात यावी! अशी मागणी पत्रकार संघटने तर्फे दि.२० जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केले आहे.
यावेळी न्यु व्हिजन पत्रकार संघटनेचे दिनेश रायपूरे, दत्ता बोबडे, सुशिल अडकिने, शुभम कडू, महेश टिपले, प्रितम बागडे, सौ.पुष्पा कुळसंगे, आशिष साबरे, इरफान शेख, अजय भुसारी इत्यादि प्रतिनिधि पत्रकार उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या