Type Here to Get Search Results !

शिवपुराण कथेसाठी राजुरा मारेगाव वणी रोड बंद न करण्याची मागणी

वणी, शुभम कडू :

                              शिवपुराण कथेचे आयोजन केले असल्याने या सात दिवसाच्या प्रवचनाला लाखो भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून मारेगाव ते वणी हा महामार्ग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी,गृहविभागाने काढला आहे. ह्यामुळे राजूर, निंबाला, भांदेवाडा, बोदाड, झरपट, सोमनाला व कळमना  ह्या गावांना त्रास होणार आहे ह्या करीता संबंधित गावांचा रहिवासियांकडून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना वणी-मारेगाव हा महामार्ग बंद न करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. 

                वणी ते मारेगाव हा महामार्ग बंद करण्यात आल्याने  कोणतीही वाहने नेता येणार नसल्याने 

  • शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेता येणार नाही.
  • वणी व लाल पुलिया परिसरात तसेच अन्य ठिकाणी रोज मजुरीवर जाणाऱ्या मजुरांना कामावर जाता येणार नाही.
  • ऑटो ने वणीला शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जाता येणार नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
  • वाहतूक बंद झाल्याने चुना उत्पादन ठप्प होणार परिणामी  चुना उद्योगातील शेकडो कामगार रोजमजुरी पासून वंचित होणार.
  • गावात किराणा व अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होईल व येथील किराणा व अन्य व्यवसाय बंद राहतील व त्यामुळे येथील नागरिक आवश्यक वस्तूंपासून वंचित होतील.
  • कोळसा खाण व अन्य कामावर येणारे कामगार वाहतूक अभावी येऊ शकतं नसल्याने कोळसा व अन्य उत्पादनावर परिणाम होणार आहे. 

  ह्या महत्त्वाचा मुद्दा व प्रश्न निवेदनात तथा एडी. एस.पी. जगताप साहेब यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात आली. ह्या वर जगताप साहेबांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 

        ह्या प्रसंगी राजूर, भांदेवाडा, निंबाळा ग्रामपंचायत व राजूर बचाव संघर्ष समितीने निवेदन सादर करून रस्ता सुरू ठेवण्याची मागणी केली. यावेळेस राजूर सरपंच विद्या पेरकावार, मोहम्मद असलम , कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, साजिद खान,अनिल डवरे, प्रदीप बांदुरकर, सुशील आडकिने, प्रवीण पाटील, श्रीनिवास अलवलवार, महेंद्र श्रीवास्तव, भांदेवाडा उपसरपंच प्रेमा धानोरकर, निंबाला सरपंच सुनीता मनोज ढेंगले, कळमना सरपंच राहुल क्षीरसागर, झरपट येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप माटे प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad