Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले वाचनालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वणी, शुभम कडू :

                          शहरातील विख्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजुरकर यांच्या हस्ते सकाळी ०७:३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी यांनी देशभक्ती गीत सादर केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव गजेंद्र भोयर, सूत्रसंचालन प्रा. विजय बोबडे तर उपस्थितांचे आभार प्रा. अनिलकुमार टोंगे यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष रामजी महाकुलकर, पिंपळशेंडे, बोरकुटे, तांबे, जेनेकर, आसेकर, वाटेकर, गोहोकार, पूनवटकर, डाखरे, मोहितकर, आसुटकर, मेश्राम, सौ. देठे, सौ. वाटेकर, सौ.झांबरे, सौ. गोवारदिपे आणि वाचनालयातील सदस्य, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल शुभम कडू, सहाय्यक प्रज्वल गोहोकार व मिलिंद मालेकार यांनी विशेष परिश्रम घेतले.


प्रजासत्ताक दिन 

                         भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.  या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचारविमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad