वणी/प्रतिनिधी : वणी तालुक्यात्यातील नऊ सदस्य असलेली विरकुंड गट ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर कार्यरत असलेल्या कविता सोयाम यांच्यावर बाकी सदस्यांनी अविश्वास आणून पद खाली केले. नव्याने निवडणूक होऊन वर्षा मडावी या सरपंच पदी रुजू झाल्या. त्यांनी जी घरकुल यादी पंचायत समितीला सादर केली. त्यावर माजी सरपंचानी आक्षेप नोंदविला. त्याची दखल घेत गट विकास अधिकारी यांनी सरपंच यांना कार्यालयात बोलावून सुनावणी घेऊन, प्रकरण खारीज केले. पण कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर त्याच्यात वाद होऊन त्यांचे रूपांतर भांडणात झाले. माजी सरपंच कविता सोयाम यांनी सदस्य अमोल पारखी यांच्या कानशिलात लावली. त्यानंतर माजी सरपंच विरुद्ध विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या