महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला मोठे यश आले असून व्ही. आर. सी. एल. कंपनीकडून रस्त्याची स्वच्छतेचे काम वेगाने सुरू करण्यात आले. तर रस्त्यावरील सर्व खड्डे भरण्यात येत असून वृक्षारोपण आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे.
शासकीय नियमांना तिलांजली देत मनमानी टोल वसुली करणाऱ्या आय.व्ही.आर.सी.एल कंपनीवर कारवाई करुन चालू असेलेली टोल वसुली तात्काळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता आणि पोलीस निरिक्षक यांना निवेदन देऊन टोल वसुली थांबवण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
चंद्रपूर-घुग्गूस-करंजी हा रस्ता तयार करण्याचे काम आय.व्ही. आर. सी. एल कंपनीला देण्यात आले होते. सदर रस्ता तयार झाल्यानंतर कालदोष मर्याद पर्यंत या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे त्याच बरोबर हा रस्ता स्वच्छ ठेवण्याचे काम संबधित कंपनीचे आहे. वणी आणि परिसरात कोळसा, रेती आणि मातीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या वाहतुकीमुळे उडणारी धूळ प्रवाशांच्या डोळ्यात जात आहे. संपूर्ण रस्ता बांरवार स्वच्छ केला तर हा प्रकार थांबेल. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्यास त्याची पुनर्निर्मिती करण्याचे काम कंपनीचे आहे. मात्र सद्यस्थितीत रस्त्याच्या मधोमध मोठ मोठ्या भेगा पडल्या आहे यासर्व प्रकारामुळे अनेक अपघात होत आहे. या मार्गावर अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात पोहचविण्याचे काम हे संबधित कंपनीचे असते मात्र सदर कंपनीची एकही रुग्णवाहिका या रस्त्यावर कार्यरत नाही. कंपनी कडून प्रवाशांकरिता स्वच्छता गृहाची व्यवस्था सुद्धा नाही. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण येत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती.
या मागणीला मोठे यश आले असून कंपनीकडून रस्त्याची स्वच्छता, वृक्षारोपण आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय टाळणार असून कंपनीकडून सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या