वणी, शुभम कडू :
आज वर्तमान काळात शिक्षण, सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत जी काही प्रगती आपण बघत आहोत.ती पायाभरणी करण्यामध्ये सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे पुढील हजारो वर्षे सावित्रीआई ह्या समाजाच्या दिपस्तंभ असतील.आपण ह्या गोष्टींची जाणीव ठेवणे अपेक्षित आहे.असे प्रतिपादन स्त्री चळवळीच्या अभ्यासक प्रतिक्षा गुरनुले,अमरावती यांनी केले.
मराठा सेवा संघ प्रणित " दशरात्रौत्सव २०२४ " अंतर्गत दि.३ जानेवारी ला सावित्रीआई फुले जयंती सोहळ्याचे निमीत्य विराणी फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरिल वक्तव्य केले.जिजाऊ ब्रिगेड आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती राजपुत होत्या तर विचारमंचावर अतिथी म्हणून चिखलगांव च्या सरंपच रुपाली कातकडे,माधुरी वाघमारे,माया आसुटकार उपस्थित होत्या.प्रतिक्षा गुरनुले यांनी याप्रसंगी देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य,लोकशाही,महिलांचे प्रश्न,शिक्षण व आरोग्य सुविधा यांवर परखड भाष्य केले.सत्ताधारी लोकांकडुन संविधानिक पद्धतीने होणारा विरोधाचा सुर असाच दाबल्या गेला तर देशाची घटना आपोआप धोक्यात येईल,असा ईशारा दिला.आजच्या सुशिक्षित आणि सुस्थापित महिलांनी सावित्रीआई चा वारसा जोपासल्यास समाज त्याचे अनुकरण करील.असा आशावाद व्यक्त केला.अध्यक्षीय मनोगतामध्ये भारती राजपुत यांनी दशरात्रौत्सवाचे महत्व विषद करून १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.रुपाली कातकडे आणि माधुरी वाघमारे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ सोनाली थेटे,किरण गोडे, मिनाक्षी गायकवाड,सरिता घागे यांच्या सामुहिक जिजाऊ वंदनेने झाला.प्रास्ताविक मनोगत विशाखा चौधरी, सुत्रसंचालन हर्षदा चोपने -कुर्ले तर आभारीय मनोगत रेखा बोबडे यांनी व्यक्त केले.पाहुण्यांचे स्वागत रेणुका भोयर,सुवर्णा मत्ते,मिनाक्षी गायकवाड,ज्योती गोहोकार आणि मंजुश्री टोंगे यांनी पुस्तक भेट प्रदान करून केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जानु अजाणी,दत्ता डोहे,आशीष रिंगोले,किरण गोडे,रंजना जिवतोडे,पौर्णिमा भोंगळे,सरिता घागे,सिमा डोहे यांनी प्रामुख्याने परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या