Type Here to Get Search Results !

जम्मू भाई यांच्या वाढदिवसानिमित्त १९ जोडप्यांचा निकाह संपन्न

वणी, शुभम कडू : 

                         दि. ३० डिसेंबर रोजी वणी येथील मोमिनपूरा आशियाना हॉल येथे सामूहिक विवाह मोठ्या उत्साहात १९ जोडप्यांचा विवाह आनंदात पार पडला, आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक जमीर खान उर्फ जम्मू भाई यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाला वणीतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नव दाम्पत्यांना आर्शिवाद दिला. संध्याकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास विराणी हॉल येथून बग्गी वाहन आणि घोड्यावर विराजमान असलेल्या नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. ही वरात शहरातील प्रमूख मार्गाने निघून शेवट आशियाना हॉल येथे येवून सामूहिक विवाह सोहळ्याला सूरूवात झाली.सर्वप्रथम मौल्लवीद्धारे हाफिज-ए-कूराण पठण करून या सोहळ्याचे शूभारंभ करण्यात आला, त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे जम्मू खान यांच्याद्धारे शाल, स्मृतिचिन्ह व बूके देऊन स्वागत करण्यात आले. 

       या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार, आमदार प्रतिभा धानोरकर, विजयबाबू चोरडीया, संजय देरकर, अँड देविदास काळे, भाई अमन, राकेश खुराणा, रवी बेलूरकर, शमीम अहेमद, रज्जाक पठाण, संजय खाडे, राजाभाऊ पाथ्रडकर, निकेश गुप्ता यांची उपस्थिती होती. 


👇 जम्मू भाई यांच्या वाढदिवसानिमित्त १९ जोडप्यांचा निकाह संपन्न 👇




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad