Type Here to Get Search Results !

भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणा-या समाजकंटकावर कारवाई करा

वणी/प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगत विजासन या ठिकाणी या ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती होती. अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना केल्याची घटना सोमवार, ०१ जानेवारी २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

             या घटनेनं महाराष्ट्र राज्यभरात समाजबांधवांच्या भावना दुखावलेल्या गेल्याने प्रत्येक जिल्यात तालुक्यातून निषेध सुरु आहे. या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करून दोषींना मोठी कारवाई करण्यात यावे. अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे वणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे द ग्रेट पिपल्स ग्रुपच्या वतीने केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करून दोषींना अटक करने आवश्यक आहे. 

        यावेळी द ग्रेट पिपल्स ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय बोबडे, उपाध्यक्ष इजहार शेख, सचिव दिनेश रायपूरे, डॉ.अतिक सय्यद, दत्ता डोहे, सुशील  अडकिने, राजू पिंपळकर, राहुल आहुजा,प्रितम बांगडे, अजय वावरे, आकाश महाडोळे व इत्यादि मोठया संख्येत उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad