वणी/प्रतिनिधी ( शुभम कडू ) : शिवसेना नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, वणी नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय देरकर यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी निवासस्थानी मोठ्या उत्साहाने साजरा केला. शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला. यामध्ये पत्रकार, डॉक्टर, आशा वर्कर, जेष्ठ शिवसैनिक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संजय देरकर यांनी कोणत्याही प्रकारची आतिषबाजी न करता साध्या पणाने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व वणी व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संजय देरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या