संपुर्ण देशवासियासाठी अभिमानास्पद असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि राममूर्तीची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते सोमवारी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान वेदमंत्रांच्या उच्चारवात संपन्न झाली. यानंतर देशभरात रामभक्त आणि सामान्य जनतेमध्ये आनंद आणि उत्साहाची भावना पाहायला मिळत आहे.
श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर श्री राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. या अभुतपुर्व सोहळयाचे औचित्य साधत कनकवाडी येथील हनुमान मंदीरात संध्याकाळी ०७:०० वाजता महाआरती करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला. रामगीते, रामनामाचा जयघोष, रामाची आराधना आणि अखेरीस झालेली महाआरती यामुळे परिसर भक्तिमय झाला होता. 'जय श्री राम', 'सियावर रामचंद्र की जय' 'श्रीराम जय राम जय जय राम' अशा उद्घोषांनी परिसर दुमदुमला होता.
👉 श्री स्वामी समर्थ केंद्र चिखलगाव वणी येथे शबरी भक्ती दर्शन नाटिका 👇👇
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या