अयोध्येत सहा दिवसांच्या धार्मिक विधीनंतर सोमवारी श्री. रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात नागरिकांचे दिवाळी साजरी केली सारा देश राममय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले ठीक ठिकाणी मनोहर रोशनी करण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षनेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून सन १९९० आणि ९२ सालच्या कार सेवकांचा सत्कार, फटाक्यांच्या आतिषबाजी, लेझर शो सह महाआरती करण्यात आली. असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. लेझर शो आणि नयनरम्य आतषबाजीने वणी परिसर उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला राजू उंबरकर यांच्या हस्ते हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी वणी मतदारसंघातील २० कारसेवकांचा सन्मान देखील करण्यात आला. प्रभू श्रीराम यांचे मंदिर अयोध्येतच होत असल्याने कारसेवकांना अक्षरशः भरून आले. यावेळी त्यांच्या डोळ्यात प्रभू श्रीरामाविषयी अपार भक्ती दिसत होती. मतदारसंघातील सर्व कारसेवकांना एकत्रित आणून आमचा सन्मान कोणी केला नाही मात्र मनसेच्या वतीने आणि राजू उंबरकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आमचा सत्कार होत असून आम्ही भारावून गेलो आहोत, असं मत कार सेवकांनी व्यक्त करत उंबरकर यांचे आभार मानले.या अशा अभूतपूर्व उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला. रामगीते, रामनामाचा जयघोष, रामाची आराधना आणि अखेरीस झालेली महाआरती यामुळे परिसर भक्तिमय झाला होता. 'जय श्री राम', 'सियावर रामचंद्र की जय' 'श्रीराम जय राम जय जय राम' अशा उद्घोषांनी परिसर दुमदुमला होता. लेझर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अत्यंत नेत्रदीपक आणि भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सर्व कार सेवक, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, राम जयंती उत्सव समितीचे रवी बेलुरकर, धनंजय त्रिंबके, मनसे महिला सेना जिल्हा अध्यक्षा सौ अर्चना बोधाडकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, यांच्या सह मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, गजानन मिलमिले, रुपेश ढोके, शिवराज पेचे, चांद बहादे, विनोद कुचनकर, राजु बोधाडकर, राकेश शंकावार, शिवराज महाकुलकर, लक्की सोमकुंवर,वैभव पुराणकर, संस्कार तेलतुंबडे, हिमांशू बोहरा, गौरव पुराणकर यांच्या सह मतदार संघातील सर्व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामारकर तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गोहोकर यांनी मांडले.लवकरच अयोध्यावारी...
"५०० वर्षानंतर अयोध्या नगरीत प्रभु श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले असुन काल पंतप्रधानांच्या हस्ते या रामलल्लाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना व मंदिराचे विधिवत पुजन करून उद्घाटन करण्यात आले. तर सर्व भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले असणार, या मंदिराचे मतदारसंघांतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लवकरच मोफत अयोध्यावारी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी यावेळी दिली."
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या