Type Here to Get Search Results !

भीषण अपघात! कार-ट्रक अपघातात एक जण जागीच ठार

मारेगाव/प्रतिनिधी :  येथील शेख परिवार चंद्रपूर येथे एका कार्यक्रमास अर्टिका क्रमांक MH 13 डे 7906 ने जात असतांना निंबाळा फाटा चे अलीकडे समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या ट्रक MH 34 BG 1337 ने अर्टिका कारला जबर धडक दिल्याने कार रस्त्याच्या कडेला काही फूट फरफटत नेले.
   कार चालवीत असलेले शेख नवाज शेख मुजफ्फर, २८ वर्ष हे जागीच ठार झाले. झेबा शेख बरकत २५ वर्ष, हाजरा शेख मुजफ्फर ६० वर्ष, हसनेन शेख बरकत ०४ वर्ष, अहमान शेख बरकत दीड वर्ष, कमर सय्यद ३८ वर्ष हे सर्व मारेगाव व आलिया शेख १५ वर्ष रा. मार्डी हे अपघातात जखमी झाले. जखमींना वणी येथे दाखल करण्यात आले. यामधील दोघांना चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मारेगाव शहरात शोककळा पसरलीय आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad