वणी/प्रतिनिधी : वणी वरोरा मार्गावर झोला शिवार परिसरात बसने दुचाकीला जोरदार धक्का दिल्याने दुचाकी वाहना वरील ४० वर्षांय महीला जागीच ठार झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी ०५:०० वाजता चे सुमारास घडली.
भीषण अपघात! कथा एकून परत येत असताना काळाचा घाला, महिला जागीच ठार
0
वणी वरून चंद्रपूर कडे जाणारी बस क्रमांकएम.एच.१४ एच.एस. ८२२७ ही भरधाव वेगाने जात असताना झोला परिसरात दुचाकी क्रमांक एम.एच.३४ सी.ई. ३१२० या दुचाकीला धडक दिली.या अपघातात दुचाकी वरील महीला बसच्या चाकाखाली आल्याणे जागीच ठार झाली तर बस चक्क दुभाजकावर चढली.
या अपघातात जयश्री शंकर उमाटे (४५) रा. कुनुरा ता, भद्रावती ही महिला दुचाकी वरून खाली पडली, व बसच्या चाकाखाली चिरडल्या गेली. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवीत असलेला मृतक महिलेचा मुलगा प्रतीक शंकर उमाटे (२५) व दुचाकी वरील अन्य एक महिला चित्रा सुरेश उमाटे (५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या