वणी/प्रतिनिधी :
राजकुंवर महाविद्यालय, वणी येथे दि.२८ जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजकुंवर महाविद्याल याचे प्राचार्य राम ठमके तर उद्घाटक म्हणून प्रा. भरतसिंह ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राकेश व-हाटे, प्रा. प्रमोद पाठक होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करून विविध प्रकारच्या स्पर्धेत वेशभूषा, गीत गायन, नृत्य, यामध्ये गोंडी नृत्य, गोंधळ, लावणी, नाटक अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन सहकार्य केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उमेश भोयर,प्रा. पूजा देठे,प्रा.मोनू गोरे, प्रा.माधुरी बोधाने,प्रा.प्रगती भांदक्कर यांनी सहकार्य केले. तसेच कु. वैष्णवी नागपुरे, मिलिंद भगत अमित पचकटे यांनी भोजन व्यवस्थेसह सहकार्य केले. यामध्ये ६४ विद्यार्थांनी भाग घेतला होता, जवळपास सर्वच विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या