Type Here to Get Search Results !

लोकांच्या अपेक्षांमुळे मराठा सेवा संघाची जबाबदारी वाढली - पुरुषोत्तम खेडेकर

वणी, शुभम कडू : 

                             १९९० मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना झाली त्या काळातील प्रश्नांपेक्षा वर्तमान काळातील प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे.परंतु दैनंदिन जिवनाशी संबंधित असे मुलभुत प्रश्न कायम आहेत.समाज आणि सामान्य माणुस मोठ्या आशा आणि अपेक्षेने मराठा सेवा संघाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आहे.त्यामुळे समाजाकरिता आपली जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

         विदर्भातील जनसंवाद दौऱ्या निमीत्य मराठा सेवा संघाचे वतीने आयोजित कुणबी सांस्कृतिक भवन वणी येथे दि २३ जानेवारी ला संपन्न झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीत त्यांनी वरील कथन केले.या प्रसंगी मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे,शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे,डॉ.किशोर बुटले,मराठा सेवा संघ वणी चे अध्यक्ष अंबादास वागदरकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपुत हे मंचावर उपस्थित होते.सर्व समाजात सलोखा कायम राहावा आणि त्यांनी आपल्या समृद्ध अशा सिंधु आणि कृषी संस्कृतीला पुढे न्यावे,अशी आपली संकल्पना आहे.आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा आहे त्यामुळे ह्या विषयावरुन समाजा -समाजात वितुष्ट निर्माण होणे धोकादायक आहे.असे प्रयत्न प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे होत आहेत.आपण याकडे गांभीर्याने लक्ष ठेवावे.आणि समाजातील सलोखा आणि बंधुता कायम ठेवण्याकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे.आपण लोक पौष महिन्यात मंगल असे सर्व संस्कार कार्यक्रम टाळत असतो.परंतु देशातील अती महत्वाचा धार्मिक असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा याच पौष महिन्यात २२ जानेवारीला संपन्न झाला.यातुन आपल्या समाजाच्या खुळचट व निरर्थक कल्पना लक्षात येतात.तसेच राजकीय फायदयाकरिता धर्म व्यवस्थेला कसे वापरता येते.हे ही लक्षात येते.पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही सामाजिक असंतोषातील संधी शोधावी.आणि अविरत कार्य करत राहावे.असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

        या प्रसंगी मराठा सेवा संघ वणी चे वतीने क्रां.सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयास २५००० रु ची देणगी प्रदान करण्यात आली.प्रा.अर्जुन तनपुरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.डॉ.किशोर बुटले,अंबादास वागदरकर,अजय धोबे,भारती राजपुत यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.बैठकीचा प्रारंभ सामुहिक जिजाऊ वंदनेने झाला.तसेच संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष विनोद चौधरी,यवतमाळ यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.बैठकीचे सुत्रसंचालन दत्ता डोहे यांनी तर उपस्थितांचे आभार संजय गोडे यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत भाऊसाहेब आसुटकार,आशिष रिंगोले,विजय खाडे,सुरेन्द्र घागे,वसंत थेटे,शंकर पुनवटकर,विनोद बोबडे,प्रशांत धांडे ईत्यादींनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad