वणी, शुभम कडू :
स्माईल फाउंडेशन ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेचं भरीव कार्य आहे. सोबतच विविध क्षेत्रांतही या संस्थेचं काम मोठं आहे. या सगळ्या कार्याची दखल महसूल प्रशासनानं घेतली. गणराज्यदिनानिमित्त शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर देविदास जाधव यांचासह त्यांच्या चमूचा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं. सोबतच पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्यात. स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या