श्री प्रभुरामचंद्र प्रतिष्ठापणा सोहळ्याचा आंनद देशभर साजरा होत आहे. यानिमित्य येथील जैताई मंदीर देवस्थानच्या प्राचार्य राम शेवाळकर रंगमंचावर दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ०७:०० वाजता कोकणातील प्रतिष्ठीत लोककलावंतांच्या 'दशावतार' या पारंपारिक लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले विजय चोरडिया यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोळब भटवाडी, मालवण सिंधुदुर्ग येथील सुप्रसिध्द कलावंत बाबा मयेकर आपल्या पंधरा कलावंतां सोबत' रामकथेवर' हे लोकनाट्य सादर करणार असून वणीकरांनी याचा आंनद घ्यावा असे आवाहन आयोजक विजय चोरडिया यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या