जि. प. बांधकाम उपविभाग वणी येथील उपअभियंता श्री. एस. बी. वाठोड हे दिवाळीच्या अगोदर पासूनच त्यांच्या कार्यालयात सातत्याने उपस्थित राहत नसल्याने उपविभागातील रस्त्याच्या समस्ये संदर्भातील निवेदनाची किंवा तक्रारींची वेळेत योग्य ती दखल घेतल्या जात नाही त्याबरोबरच रस्त्याच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून त्वरीत कार्यवाही केली जात नाही. गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखलही घेतली जात नाही, त्यांना फोन केला असता ते फोन सुद्धा उचलत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांनी केला आहे.
त्यामुळेच अशा निवृत्तीचे दिवस मोजणाऱ्या अधिकाऱ्यामुळे शासनाव्दारे त्यांच्यावर केला जाणारा वेतनाचा खर्च वाया जात आहे व गावकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे वणी उपविभाग कार्यालयातील सिसीटीव्ही फुटेज बघुन श्री. एस. बी. वाठोड या उपअभियंत्यांना त्वरीत सस्पेंड करण्यात यावेत व नविन उपअभियंत्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निवेदन मा.कार्यकारी अभियंता साहेब, जि. प. बांधकाम विभाग यवतमाळ यांना सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांनी दिले.
या तक्रारीची दखल मुख्य कार्यकारी अभियंता साहेब घेतील का ? की या तक्रारीकडे दुर्लक्ष करून अभियंता यांना पाठीशी घालेल ? हे येत्या काही दिवसात कळेलच.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या