वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा गुरुदेव सेवा मंडळ, विठ्ठलवाडी वणी यांच्या वतीने राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेतील पुरुष गट साठी ७७१ रुपये,स्त्री गट साठी ६०१ रुपये, बाल गट साठी ३०१ रुपये तर ग्रामीण स्पर्धेतील पुरुष गट साठी ५०१ रुपये, स्त्री गट साठी ४५१ रुपये, बाल गट साठी ३५१ रुपये याप्रमाणे आहेत. ही तीन दिवसीय स्पर्धा दिनांक १९, २०, २१ जानेवारी २०२४ ला होणार आहे. या स्पर्धेमध्ये नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे.
भव्य नेत्र तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिर
दि. १९ जानेवारीला सकाळी १०: ४५ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी १२:१५ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहेत. तरीही वणी शहरातील व वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या