Type Here to Get Search Results !

मतदारसंघातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जीवन विमाकवच - मनसे नेते राजूभाऊ उंबरकर


महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  जेलभरो आंदोलन केले आहे. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राजु भाऊ उंबरकर यांची भेट घेऊन, या आंदोलनाला मनसे स्टाईल करून आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सेविकांनी केली होती. आज या आंदोलनाला राजुभाऊंनी भेट देऊन पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शविला.

अंगणवाडी कर्मचारी हा समाजातील महत्वाचा घटक असुन बालकांचे पोषण व जडणघडण करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. अंगणवाडीतुनच लहान बालकांना चांगले संस्कार देणे, त्यांच्या आरोग्य विषयक बाबींची दक्षता घेणे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामांसोबत गरोदर माता भगिनींचे सर्वेक्षण करून माता व बालकाचे आरोग्य सुदृढ राहील याची दक्षता घेणे आदी कामे पार पाडली जातात. 
राज्य सरकारच्या सर्व योजनांची कामे मतदारसंघात पोहोचवण्याचे काम आम्ही करत असतो; परंतु आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला कोणालाही वेळ नाही असे सेविका आणि मदतनीस यांनी सांगितले. तुमचा भाऊ या नात्याने हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव आहे यापुढेही मी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुमच्या सोबत कोणीही नाही असे मनात धरू नका. पुढील काळात मतदारसंघातील सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जीवन विमा काढून देण्याचे आश्वासन भाऊंनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad