यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी शहरप्रमुख
अनिकेत चामाटे, निखिल बुच्चे,पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी तालुका उपाध्यक्ष पुसाराम नलभिमवार यांनी निवडीबद्दल प्रहार वणी तालुकाध्यक्ष नितीन गोरे यांचे आभार मानले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाची विचारधारा पोहचवण्यास अग्रेसर राहील, प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातुन सर्वांशी समन्वय साधून पक्षाच्या ध्येय- धोरणानुसार कार्य करण्यासाठी जनतेला प्रेरित करील, पक्षाला मजबुत करण्याचे कार्य व पक्षाचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवुन प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटन मजबुत करणार असे निवडीबद्दल बोलताना वणी तालुका उपाध्यक्ष पुसाराम नलभिमवार यांनी माहिती दिली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वचस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या