वणी, शुभम कडू : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या वाहतूकीमुळे वणी तालुक्यांतील ७ - ८ गावांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी गेल्या ६ दिवसापासून ही वाहतूक बंद केली होती. विकलीचे वाहतूक पूर्ववत व्हावी व या आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी काल १२ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचा हा तिढा सुटला आहे.
वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे तालुक्यातील येणक, येनाडी, कोलगाव, शेवाळा, साखरा, शिवणी या गावातील शेती पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने ही नुकसान भरपाई मिळावी व या गावातील वाहतुकीचा रस्ता पूर्ववत करुन द्यावा, या मागणीला घेऊन मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिनांक ०७ डिसेंबर पासुन वेकोलिची वाहतूक बंद केली होती. ही वाहतूक पूर्ववत व्हावी व या समस्येवर तोडगा निघावा यासाठी काल दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित सर्व विभाग व शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वणीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह वेकोलिचे क्षत्रिय महाप्रबंधक उपस्थित होते. हेक्टरी २५ क्विंटल या हिशोबाने हमी भावानुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी उंबरकर यांनी यांनी केली. नैसर्गिक आपत्ती असल्यास वेकोलि कडून १३ हजार ६०० रुपये हेक्टरी भरपाई देण्यात येतं असते. हाच निकष लावून या घटनेत नुकसान भरपाई देण्यात येतं होती. परंतु सदर नुकसान हे मानव निर्मित असल्याची मत उंबरकर यांनी मांडले. तर शेतकऱ्यांचा मागणीनुसार भरपाई आमच्या अधिकार क्षेत्रात नसून यासंबंधी वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा लागेल अशी माहिती क्षत्रिय महाप्रबंधक आणि यावेळी दिली. तर सद्यस्थितीत आम्ही हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देऊ असे ही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत सदर भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी तर पुढील वाढीव भरपाईसाठी मी स्वतः वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चर्चा करेल आणि ती मदत मिळवून देईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई देण्यासाठी कोळसा बोर्ड कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर या वाहतूकी मुळे खराब झालेल्या रस्त्यासाठी वेकोलि कडून ३२ कोटी रुपये बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आल्याची माहिती वेकोलि कडून देण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचा तिढा सुटला उंबरकर यांनी मांडली शेतकऱ्यांची व्यथा
0
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु उंबरकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड क्षेत्रिय महाप्रबंधक आभा सिंग, प्रकल्प नियोजन अधिकारी राजू गिल, वणी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, वणी चे तहसिलदार नायब तहसिलदार विवेक पांडे, कृषी अधिकारी माने आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.
"शेत पिकांची नुकसान भरपाई व या गावातील वाहतुकीचा रस्ता पूर्ववत करणे अशा विविध मागण्यांसाठी करण्यात येत असलेले चक्काजाम आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही होईल आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळेल."
"सदर प्रकरण गांभीर्याने लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्याने यामध्ये मध्यस्थी केली. पुढील नुकसान भरपाई साठी वेकोलि बोर्डाकडे पाठपुरावा करेल असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवत आम्ही आंदोलन मागे घेतले येत्या काही दिवसात वेकोलि कडून पुढील भरपाई न मिळाल्यास हे प्रकरण वेकोलीला जड जाईल याची नोंद घ्यावी."
- राजु उंबरकर
पक्ष नेते - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या