ऑल इंडिया ग्रामिण डाक सेवक युनियन संघटना (AIGDSU), नॅशनल युनियन ऑफ ग्रामिण डाकसेवा संघटना (NUGDSU) यवतमाळ विभाग यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने कॉ.एस.एस. महादेवस्या यांच्या नेतृत्वात ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यासाठी वेळोवेळी बरेच लढे देण्यात आले पण सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात आले मात्र आश्वासनांची अमलबजावणी कधी केलीच नाही. त्यामुळे कॉ. एस. एस. महादेवव्याजी व मा. पी. यु. मुरलीधरणजी यांच्या नेतृत्वात कृती समिती (जे.सी.एम.) तयार करण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वात दि. ४ ऑक्टोंबर २०२३ रोजी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता, पण सरकारकडून संपाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नॅशनल युनियन ऑफ ग्रामिण डाकसेवा संघटना (NUGDSU) च्या वतीने दि. १२ डिसेंबर २०२३ पासुन बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात आला.
संपाच्या मागण्या : १) ग्रामिण डाक सेवकांना ८ तासाचे काम देवून पेंशन लागु करा.
२) कमलेशचंद्र कमिटीच्या संपुर्ण शिफारशी लागू करा. अ) १२-२४-३६ चे प्रमोशन (ब) ५ लाख ग्रॅज्युटी (क) ५ लाख गृप इंन्शुरन्स ड) १८० दिवसांच्या पेड लिव्हस व ग्रामिण डाकसेवक यांच्या परिवाराला मेडीकल सुविधा पुरविण्यात याव्यात.
३) IPPB,PLI,RPLT, सेव्हिंग स्किम व मनरेगा वर्क लोडमध्ये समाविष्ट करा, आणि इतर नविन नविन योजना डिपार्टमेंट राबवत आहे. उदा. नविन विमा कंपनीचे काम हे सर्व काम आमच्या वर्क लोडमध्ये लागु करा, टार्गेटची सक्ती कमी करा. व कमीशन सिस्टिम बंद करा.
४) विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांकडून गैरकानुनी आदेश काढून टार्गेट नावाखाली दमदाटी करणे, बदली करणे, धमक्या देणे इत्यादी प्रकार थांबवण्यात यावे.
५)विभागीय कर्मचान्याप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, TA,DA, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता आणि यासह इतरही मागण्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या