या मेळावानंतर जनतेच्या विविध मागण्यांना घेवून वंचित बहुजन आघाडी व श्री गुरुदेव सेना यांचा दुपारी 2 वाजता 'खबरदार' बेधडक मोर्चा वणीतील तहसील कार्यालयावर तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत धडकणार आहे.
आज वंचित बहुजन आघाडीचा तालुकास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा
0
वणी, शुभम कडू : वंचित बहुजन आघाडीचा वणी तालुकास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा वणी येथील शेतकरी मंदिर जवळील स्व. नानासाहेब गोहोकर सभागृहात आज दि. १३ डिसेंबर २०२३ बुधवारला सकाळी ११ ते २ यावेळात आयोजित केला आहे. या भव्य कार्यकर्ता मेळावाला अध्यक्ष म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे उपस्थित असणार असून मार्गदर्शक म्हणून अकोला येतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुद भिरड , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, वंचितचे पच्छिम विदर्भाचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील , जिल्हाकार्याध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, जिल्हा महासचिव पुष्पा शिरसाट, वैशाली गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष अर्चना कांबळे, युवा आघाडीचे जिल्हध्यक्ष आकाश वाणी, जिल्हा सल्लागार ऍड. विप्लव तेलतुंबडे आदी मान्यवर उपस्थित असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या