झरी :
तालुक्यातील मुकुटबन येथील आर्या इंटरनॅशनल स्कूल मुकुटबन येथे मोठ्या उत्साहात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. विद्यार्थी यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांची भूमिका साकारली. शिक्षकांसारखे पेहराव करून त्यांनी वर्ग शिकविले शिकविण्याचा आनंद तसेच जबाबदारी उत्तमरित्या अनुभवली. ही जयंती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींना गुरु व शिक्षकांना आदरांजली वाहण्याचा प्रसंग आहे.
यावेळी मुख्याध्यापक व इतर शिक्षकांची भूमिका ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अनुभवली त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. त्यांना कार्याची पावती म्हणून सन्मानित करण्यात आले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाला मुख्याध्यापिका बबिता झवेरी व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन महेश चुक्कलवार यांनी केले तर आभार अंकिता सातपुते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकाकडून सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या