वणी :
महिन्यातील पहिली तारीख १ मे जगभरात कामगारांना, मजुरांना समर्पित केली जाते. म्हणून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस' म्हणजेच 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' म्हणून साजरा केला जातो.
याच दिवशी अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यामुळे आजचा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या अनुषंगाने वणी शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी वणी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त वाचनालयातील प्रांगणात वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. पुरुषोत्तम पाटील आणि अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, यामध्ये १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले, त्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी परेड, राजकीय भाषणे आणि विविध कार्यक्रम होतात. महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी जपली जाते. मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
यावेळी वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र गीत गायन करून ध्वजास मानवंदना दिली. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव गजेंद्र भोयर, प्रास्ताविक संचालक अनिलकुमार टोंगे तर उपस्थितांचे आभार संचालक सुरेश राजूरकर यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे सदस्य, आजीवन सभासद, वाचक, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या