वणी -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने संविधान दिना साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला होता. संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आजच्या संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी भारतीय नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे वचन दिले पाहिजे. आपण संविधानाच्या मूल्यांचे पालन करूया आणि भारतीय लोकशाहीला मजबूत करूया, असे विचार किरणताई देरकर संस्थापक अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी यांनी व्यक्त केले. यावेळी चंदाताई मुन माजी पंचायत समिती सदस्य, पुष्पाताई भोगेकर माजी पंचायत समिती सदस्य, वृषालीताई खानझोडे माजी उपासभापती वणी, मंदा सोनारखन, प्रगती घोटेकर, मिनाक्षी मोहीते, सुरेखाताई डेंगळे, मंजूताई इनामे, वेणुताई झोडे, लताताई फलफुलवार, माजी सरपंच शिरपूर सारिका थेरे, सिमा बालगुणे, महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या