वणी, शुभम कडू :
वे.को.लि अधिनस्त असलेल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये रोजगारासाठी स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परराज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. या ठिकाणी येथील स्थानिक भूमिपुत्रांचा प्रथम अधिकार आणि हक्क आहे. परंतु त्यांना सदर कंपनी रोजगारापासून वंचित ठेवत आहे.
त्यामुळे वे.को.ली. प्रशासनाने लक्ष घालून येथील युवकांना रोजगार देण्याची ताकीद कंपनीला द्यावी तसेच येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल यातून होणाऱ्या सर्व परिणामास वे.को.ली. प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, स्थानिक नागरिक आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या