Type Here to Get Search Results !

क्रिकेट लीग 2024 ची चॅम्पियनशिप "पॅन्थर्स" कडे

वणी : 

         छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम वणी द्वारा आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट लीग 2024 ची चॅम्पियनशिप टायटन्स संघाला नमवून "पॅन्थर्स" संघाने पटकावली.

       सी.एस.एम.इकॉनॉमिक फोरमने प्रथमच आपल्या सदस्यांमध्ये विभागलेल्या विविध सात संघांमध्ये क्रिकेट लीग सामने खेळवले गेले. दि. 7 व 8 डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या क्रिकेट लीगचे फोरमचे अध्यक्ष श्री अंबादास वागदरकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. 

          श्री. भास्कर दुमोरे यांच्या नेतृत्वातील टायगर्स टीम, ऍड. अमोल टोंगे यांची चॅलेंजर्स, संजय जेऊरकर यांची वॉरिअर्स, दत्तात्रय पुलेनवार यांची रायडर्स, प्रदिप बोरकुटे यांची पँथर्स, फोरमचे सचिव मंगेश खामनकर यांची रॉयल्स आणि अजय धोबे यांची टायटन्स अशा सात संघात शासकीय मैदान वणी येथे रंगतदार सामने झाले. प्रत्येक सामन्यागणिक झालेली चौकार, षटकारांची आतिषबाजी उपस्थित प्रेक्षकांच्या आनंदात भर घालणारी ठरली...केवळ 8 ओव्हरमध्ये सर्वाधिक 108  ही धावसंख्या उभारणारा रॉयल्स हा संघ सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरला. 

       सचिन ढोके, सुरेश कनाके, प्रदिप बोरकुटे, ऍड.आकाश निखाडे, राहुल कुत्तरमारे, राकेश वैद्य,मनोज भगत,जीवन चौधरी, जितेंद्र जेऊरकर यांना विविध सामन्यांतील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यांचे लाईव्ह समालोचन सी.एस.एम.इकॉनॉमिक फोरमचे सहसचिव नितीन मोवाडे, जयप्रकाश सूर्यवंशी,अभय पानघाटे यांनी केले. स्कोरशीटवरील लेखनकाम रवि लाडसे,भाऊसाहेब आसुटकर, दिनेश बल्की, अमोल लोखंडे यांनी सांभाळले.

       संपूर्ण सामन्यांसाठी उत्कृष्ट निर्णय देणारे पंच श्री अरुण डवरे, नत्थू नगराळे,भास्कर दुमोरे, जयपाल गौरकार, ऍड. अमोल कळसकर, मनिष शेरजे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सामन्यांची सुरुवात व शेवट राष्ट्रगीत गायनाने झाली.

        बक्षीस वितरणासाठी ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक वैभव ठाकरे, धनोजे कुणबी समाज संस्थेचे युवा अध्यक्ष मंगेश रासेकर, सी.एस.एम. इकॉनॉमिक फोरमचे उपाध्यक्ष अशोक पिंपळशेंडे यावेळी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रविण खंडाळकर तर  विवेक गाडगे यांनी आभार प्रदर्शन केले. 

             सदर क्रिकेट सामन्यांसाठी वीज पुरवठा करणारे वाघोबा खंडोबा देवस्थान कमिटी आणि मैदानाच्या स्वच्छतेसाठी वणी नगर परिषद प्रशासनाचे मौलिक सहकार्य लाभले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या क्रिकेट लीगच्या यशस्वीतेसाठी संचालक मारोती जिवतोडे, नरेंद्र गायकवाड, दिलीप वागदरकर, ऍड.चंद्रकांत बोन्डे, मारोती मोडक, विनोद बोबडे, प्रविणकुमार, सुनील बोर्डे, राहुल पानघाटे, निकेश माकडे, वसंता थेटे, तुमदेव देठे, संदीप दासरवार, नितेश ठाकरे, अथर्व डवरे, रवि उपरे, गुलाब राजुरकर, योगेश गोवारदीपे, सुहास जुनगरी इत्यादीनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad