Type Here to Get Search Results !

उद्या येणार जनतेच्या कोर्टाचा फैसला, यंत्रणा सज्ज, हजारो कर्मचारी तैनात

         महाराष्ट्र राज्यात भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्याशी सामना करावा लागला. महाराष्ट्र संदर्भात जे एक्झिट पोल समोर आले आहेत, त्यात महायुती आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार आहे. एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी सत्तेत कोण कोणत्या बाजुला बसणार हे ठोस निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

          विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. महाराष्ट्रात एकूण २८८ जागा असून बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. आता उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या साठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या मतदान यंत्रे हे प्रत्येक मतदार संघात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता निकाल काय लागणार ? या कडे सर्वांचे लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad