वणी :
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. नेत्यांचे दौरे वाढल्याने राजकारण तापले आहे. जाहीर प्रचारास आता अवघे तीन दिवस उरले आहेत. वणी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार मोठ्या चुरशीने होत आहे. विधानसभा निवडणुकीचा फिवर जोरात आहे. यातच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे प्रचार सभा, बैठका तसेच प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर आणि शहरांमध्ये प्रत्येक प्रभागात घर टू घर जाऊन प्रचार करीत आहे. तसेच जाहीर सभांसह पदयात्रा, कोपरा सभांवर भर देत मतदारांशी थेट संवाद साधत आहे.
वणी चा गतीने चौफेर विकास करण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वणीतून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून जनतेला करण्यात येत आहे. सलग दहा वर्षे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. मागणीमुक्त आणि समस्यामुक्त वणी हा त्यांचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा आहे. वणी शहरासह मतदारसंघात एकही समस्या शिल्लक ठेवायची नाही, असा निश्चय त्यांनी केला.
वणी च्या विकासाची सुरू झालेली ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तिसऱ्यांदा आमदार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निश्चित येणार आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुंबई आणि दिल्ली येथील सरकारच्या मदतीने वणीसाठी आणखी निधी आणतील. त्यामुळे त्यांच्या पाठीशी वणीतील जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आव्हान भाजपकडून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या