Type Here to Get Search Results !

वारचं पलटल, मनसेच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाने सर्वत्र उंबरकरच..

वणी : 

        प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मनसेचा जोरदार शक्तिप्रदर्शन मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या समर्थनार्थ शहरात हजारों मनसे कार्यकर्त्यांनी काढली रॅली. या रॅलीने शहरात मनसेमय वातावरण झालं असुन या निवडणुकीत मनसे बाजी मारणार असल्याच्या प्रतिक्रिया मतदारातून व्यक्त होत आहे.

     विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मनसे उमेदवार राजू उंबरकराच्या नेतृत्वात शहरातील शासकीय मैदानातून हजारोच्या संख्येने मनसैनिकांनी बाजारपेठ सह मुख्य मार्गातून भव्य रॅली काढून वणी मतदार संघात मनसेची वाढलेली ताकद समोर आणली.

  यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्याची आतिषबाजीसह रॅलीचे समापन कार्यक्रमात मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांनी विकास कामावरून लोक प्रतिनिधींना धारेवर धरत अनेक गंभीर आरोप केले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार हे पावसाळ्यात निघणाऱ्या काजव्या प्रमाणे पाच वर्षात एकदा नागरिकांना दर्शन देतात. असा आरोप राजू उंबरकर यांनी केले. 

       उंबरकर म्हणाले की, वणी  विधानसभेतील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. एका सदस्याला जर ठेच लागली तर ती ठेच मला लागल्याचे जाणवते. जातीपातीचा राजकारण न करता वणीला विकसित करण्याचा माझा स्वप्न आहे. त्यासाठी मला तुमचं साथ पाहिजे. असा आवाहन राजू उंबरकर यांनी केला. एकंदरीत मनसेचे शक्तीप्रदर्शन पाहता. या विधानसभा क्षेत्रात मनसे इतिहास घडवणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad