वणी :
शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यापारी, तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणारे विजयबाबु चोरडिया यांच्या पुढाकारातून स्वर्गीय पारसमल चोरडिया फाउंडेशन वणी द्वारा तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक्ट ब्रांच वणी यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी ०१ सप्टेंबर रोजी वणी तालुक्यातील घोन्सा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत श्री संत गजानन महाराज मंदिरात घोंसा येथे आयोजित करण्यात आले आहे. कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामची चमू आणि चोरडिया हॉस्पिटल वणी सेवा देणार आहे. मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना सेवाग्राम येथे उपचारासाठी पाठवण्यात येईल. आवश्यक रुग्णांना चष्मे तयार झाल्यानंतर त्यांचे चष्मे वाटप करण्यात येईल.
घोन्सा परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. विजयबाबु चोरडिया यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या