वणी :
स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रानभाजी पाककृती स्पर्धा व रानभाजी महोत्सव दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी शुक्रवारला घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ. मानसकुमार गुप्ता सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन डाॅ. सुनंदा आस्वले मॅडम होत्या. याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. रविंद्र मत्ते सर उपस्थित होते.
महाविद्यालयातील एकुण तीस स्पर्धेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. परिसरातील रानभाज्याची ओळख व्हावी, व त्यापासून बनवलेल्या पदार्थांपासून कुठली पोषक तत्वे शरीरास लाभदायक आहे. हे या माध्यमातून विद्यार्थ्यानी उलगडुन दाखविले. अनेक रानभाज्याची पाककृती बनवुन विद्यार्थ्यानी या महोत्सवामध्ये ठेवली होती. महाविद्यालयातील अनेकांनी या पाककृती स्पर्धेचा आस्वाद घेतला.
यामध्ये तुबा खान -प्रथम क्रमांक , पुजा मुळे -द्वितीय क्रमांक ,श्रुष्टी कुईटे- तृतीय क्रमांक , तसमिया अन्सारी -चतुर्थ क्रमांक , कुमकुम झाडे पाचवा क्रमांक मिळविला. तसेच सेजल ढोके यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून प्राध्यापक अंजली आञाम, किरण चटारे, यानी केले. डाॅ. सुनंदा आस्वले यांनी मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे कार्यक्रम खरोखरच विद्यार्थांसाठी महत्वाचे असुन परीसरातील रानभाजीची ओळख या निमित्ताने होऊन निसर्गाची जवळीक निर्माण होईल . अध्यक्षीय भाषणात डाॅ. मानस कुमार गुप्ता संरानी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व भविष्यात सुद्धा असे कार्यक्रम होतील अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. रविंद्र मत्ते सरांनी केले तर सुञसंचालन हेमंत मालेकार यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक संघदीप ऊके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. अजय राजुरकर, मनिषकुमार पेटकर, शुभम तोडकर, मृणाली तराळे आदींचे सहकार्य लाभले.




