प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) :
अश्वघोष सांस्कृतिक मंच वर्धा द्वारा भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित स्मृतिशेष प्रा.डॉ. प्रवीण वानखेडे स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी साय. सहा वाजता प्रसिद्ध साहित्यिक , विचारवंत तथा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारेचे प्रा . डॉ . वामन गवई यांचे संविधान संवाद भाग सात मध्ये जाहीर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे . “जागर संविधानाचा, संकल्प कृतिशील होण्याचा “या अभियानांतर्गत स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात आयोजित या संवादाचा विषय “ भारतीय संविधानाची, आंबेडकरी दृष्टिकोनातून आर्थिक मीमांसा “ हा असून या संवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे संचालक प्रा डॉ राजकुमार मुन राहणार आहे.
सदर विषय समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त संखेने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन कमेटीतील लक्ष्मीनारायण सोनवणे साहेब , नीरज गुजर ,प्रकाश कांबळे , संदीप भगत , डॉ अनिता वानखेडे ,निखिल सुशीला मोरेश्वर , प्रविण जंगले , प्रा अरविंद खैरकर ,प्रणोज बनकर , जगदीश भगत, प्रविण कांबळे , दिनेश वाणी , सुनील ढाले ,धनंजय नाखले , प्रदीप लोखंडे , प्रकाश जिंदे , राजूभाऊ थूल , मुन्ना नाखले , मुकुंद नाखले ,किशोर ढाले , राजेश कोल्हे , डॉ अरविंद पाटील , उमेश गायकवाड , शालिक भस्मे ई केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या