शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्याच्या कांदा सर्वांना रडवतो तोच कांदा आज शेतक-यांला दहा रुपये किलोला विकावा लागतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होताना दिसत नाही. मागच्या वर्षभरात झालेली अतिवृष्टी व नापिकीचा मोबदला शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही, असे असताना देखील देशाच्या शेतकऱ्यांची दखल महाराष्ट्र सरकार घेत नाही. देशात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा कापसाचा पांढरा सोन पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.
अन्न, वस्त्र, निवारा देणारा बळीराजा आज बळी पडताना दिसत आहे, म्हणून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करण्याची व नवीन पीककर्ज लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी मित्र गुरुदेव चिडे यांनी आज दिनांक २५ जूनला तहसीलदार साहेब, वणी यांच्या मार्फत निवेदनातून मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांना केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या