Type Here to Get Search Results !

राजवैभव शोभा रामचंद्र यांचे शनिवारी व्याखान

वर्धा/प्रतिनीधी (मंगेश  राऊत ) : 

                                भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित जागर संविधानाचा, संकल्प कृतिशील होण्याचा या उपक्रमांतर्गत शनिवार २९ जून रोजी सायंकाळी सात वाजता संविधान संवाद समितीचे राज्य सचिव तथा संविधानाचे अभ्यासक राजवैभव शोभा रामचंद्र कोल्हापूर यांचे जाहीर व्याखान संविधान संवाद भाग सहा मध्ये आयोजित करण्यात आले आहे. अश्वघोष सांस्कृतिक मंचतर्फ दादुराम बळीराम सवाई स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या संवादाचा विषय संविधानः काल, आज आणि उद्या' हा असून या संवादाचे अध्यक्ष अनेकांत स्वाध्याय मंदिरचे संचालक अरुण चवडे राहणार आहे अनेकांत स्वाध्याय मंदिर महावीर उद्यानाजवळ वर्धा येथील सभागृहात आयोजित या व्याखनापूर्वी सायंकाळी सहा वाजता मी संविधानाची प्रस्ताविका बोलतेय' हा एकपात्री प्रयोग जिल्हा संविधान समितीच्या सचिव शितल यशोधरा पुणे या सादर करणार आहे. 

                     फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या तमाम नागरिकांनी या प्रयोगाचा व संवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे प्रकाश कांबळे, संदीप भगत, लक्ष्मीनारायन सोनवणे, निराज गुजर, डॉ. चेतना सवाई, मयुर डफळे, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, निखिल सुशीला मोरेश्वर धनंजय नाखले, प्रविण जंगले, सुनील ढाले, प्रणोज बनकर, दिनेश वाणी, प्रविण कांबळे, राजेश कोल्हे, संजय मोडक, जगदीश भगत, गोवर्धन टेंभुर्णे, डॉ. शैलेश कदम, मुकुंद नाखले, किशोर ढाले, प्रा. शैलेश निकोसे, डॉ. अजय वाणे, डॉ. अरविंद पाटील, डॉ. प्रदीप थुल, गौतम पाटील, प्रा. अभय मकेश्वर, दादू सोनवणे, प्रकाश जिंदे, उमेश गायकवाड, शालिक भस्मे ई अश्वघोषच्या सदस्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad