Type Here to Get Search Results !

म.ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे व स्मारक वर्धा शहरात उभारण्यासाठी आमदार डॉ पंकज भोयर यांना दिले निवेदन

प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) : 

                 म.ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे व स्मारक वर्धा शहरात उभारण्यासाठी आमदार डॉ पंकज भोयर यांना दिले निवेदन.

     नगर परिषदेचे प्रशासक मा राजेश भगत, माजी अध्यक्ष संतोष सिंह ठाकुर,माजी उपाध्यक्ष मा प्रदिप ठाकूर यांची होती उपस्थिती.

          चर्चेदरम्यान नागरीकांच्या मांडल्या समस्या त्यावर तोडगा काढण्याचे दिले सर्वांसमक्ष दिले आश्वासन...

                 आमदार डॉ पंकज भोयर यांनी मागणी केली मान्य लवकरच घेणार निर्णय. 

                वर्धा शहरात जवळ जवळ अनेक महापुरुषांचे पुतळे चौका चौकात उभे राहिले तर सावरकर यांचे भव्यदिव्य स्मारक तर राजमाता जिजाऊ,संत तुकडोजी महाराज यांचे छोटेसे स्मारक शहरात उभे करण्यासाठी आमदार, खासदार व नगर परिषदेने पुढाकार घेऊन उभे कले तर शहर विकास निधीतून  आणि या सर्व पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्याची मोहीमच मा आमदार डॉ पंकज भोयर यांनी आपला विकास निधी देवून  केला मात्र म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा त्यांचे स्मारक वर्धा शहरात निर्माण करावे अशी साधी कल्पना ना आमदार डॉ पंकज भोयर ना खासदार रामदास तडस, ना आमदार रामदास आंबटकर अथवा नगर परिषदेला आली हिच बाब लक्षात घेऊन वर्धा जिल्हा पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वात म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा नगर परिषदेच्या प्रांगणात किंवा नगर परिषदेचे प्रशासक यांच्या बंगल्याच्या बाजुला सौंदर्यीकरण करत असलेल्या जागेवर बसवावा तसेच नगर परिषदेच्या जुन्या पडीत जागेवर सरकारी रूग्णालया समोररील जागेत म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे जे सतत सर्वांना प्रेरणास्थान असेल यासाठी वर्धा नगर परिषदेचे प्रशासक मा.राजेश भगत माजी अध्यक्ष संतोष सिंह ठाकुर, उपाध्यक्ष मा प्रदिपसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत नगाजी महाराज मंदीर येथे आमदार डॉ पंकज यांना हस निवेदन देऊन  सविस्तर चर्चा शिष्टमंडळाने केली ज्याला सकारात्मक  आश्वासन देत स्मारक दोन महिन्यांत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

                        छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पहिल्यांदाच शोधून संपूर्ण जगाला त्यांची सर्वसामान्यांना चे राजे हि ओळख करून देणारे त्यांच्यावर पोवाडा लिहून त्यांचे कार्यकर्तृत्वाचा इतिहास मांडणारे पहिली शिवजयंती साजरे करणारे,ब्राम्हणी कर्मकांड विरूद्ध चळवळ उभी करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून संघटन कौशल्य दाखविणारे, शेतक-यांचा आसुड हे पुस्तक लिहून शेतक-याची दैन्यावस्था सरकार व समाजा समोर ठेवणारे,शिक्षणाची गंगा संपुर्ण भारतभर पसरवून दिन दलित,आदीवाशी,भटके, अनुसूचित जनजाती ओ.बि.सी. अतिदलित महिला यांना शिक्षणाच्या  मुख्य प्रवाहात आणणारे. ज्यामुळेच आज राष्टपती पंतप्रधान, मुख्यमंत्री मंत्री ते मुख्य सचिव ,कलेक्टर, पोलिस अधीक्षक ते चपराशी पर्यंत नोकरीत सहभाग घेवू शकले तर अनेक लेखक,कवि,विचारवंत, आमदार खासदार झाले म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म.ज्योतिबा फुले यांना आपल्या गुरूस्थानी मानत होते मात्र अशा या दोन्ही महामानव असलेल्या म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा किंवा स्मारक वर्धा शहरात किंवा जिल्ह्यात निर्माण झाले नाही हि आंम्हा वर्धेकर व वर्धा प्रशासनासाठी , स्थानिक आमदार, खासदार यांच्यासाठी शरमेची बाब आहे कारण यामागे जातिय राजकिय मानसिकता,भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार धारेवर चालणा-या संघटनांचा छुपा विरोध आहे हे आजही दिसून येते.पुण्यातही पहिल्यांदा म.ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवू नये म्हणून त्यावेळी टिळकांनी प्रखर विरोध केला होता व केसरीत भारताचे दुष्मण असा लेख टिळकांनी लिहला होता वर्धा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार,ओ.बि.सी.असूनही हा विरोधाभास आहे याला घरटॅक्स व पाणिकर भरण्यासाठी जाणारे यांना लिंक नसल्यामुळे होणारा त्रास यावरही चर्चा करुन तोडगा निघाला.

                           नगर परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने आणि आमदार निधीतून नविन नगर परिषद इमारतीच्या आवारात किंवा पाण्याची टाकीखाली नगर परिषद सुरू होती त्या परिसरात समोरील मोक्याच्या जागेवर किंवा  त्या चौकात पुर्णाकृती पुतळा बसवावा तसेच नगर परिषदेच्या जुन्या पंडीत जागेवर (सरकारी रूग्णालया समोर) जागेवर  म.ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे हि सर्व वर्धेकरांची मागणी निवेदनाद्वारे डॉ पंकज भोयर यांना निवेदन देवून चर्चा करुन करण्यात आली.

                                वर्धा नगर परिषदेच्या प्रशासकांनी व आमदार डॉ पंकज भोयर यांनी यावर विचार पुर्वक मंथन करून आंम्हा वर्धेकरांच्या योग्य असलेल्या व इमानदारीने वर्धा नगर परिषदेला घरटॅक्स व पाणिकर भरणा-या नागरीकांची मागणी मान्य करावी अशी सविनय विनंती वर्धा नगर परिषद प्रशासकांना व आमदार डॉ पंकज भोयर यांना करण्यात आली यासोबतच इमानदारीने घर टॅक्स व पाणिकर भरण्यासाठी जाणारे जेव्हा नगर परिषदेचे कॅश काऊंटर वर लिंग गेली असे सांगण्यात येवून पाच पाच सहा सहा वेळा अथवा दोन तिन तास किंवा तासन् तास काम धंदा नोकरी सोडून उभे राहावे लागते त्यासाठी तेव्हाच पर्यायी व्यवस्था करावी हि मागणी शिष्टमंडळाच्या वतीने गजेंद्र सुरकार यांनी केली असता त्यावर नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता नगर परिषद प्रशासन व मी घेईल असे आश्वासनही आमदार डॉ पंकज भोयर यांनी शिष्टमंडळाला देवून उपस्थित असलेले प्रशासक राजेश भगत यांना सुचना केल्या.

          यावेळी शिष्टमंडळात विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जे वर्धा जिल्हा पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समितीच्या बॅनर खाली एकत्र येऊन त्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली असे महाराष्ट्र अनिसचे गजेंद्र सुरकार, संयुक्त कामगार आघाडीचे गुणवंत डकरे समता परिषदेचे  पुंडलिक नागतोडे,भरत चौधरी प्रमोद खोडे रमेश ठोसरीवाल रविन्द्र हिवरकर नरेंद्र चर्जन डॉ अविनाश गवळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या संचालिका शारदाबाई झामरे माळी समाज संस्थेचे  ज्ञानेश्वर हिवसे सत्यशोधक समाजाचे प्राचार्य जर्नादन देवतळे,कपिल थुटे कराटे असोशियनचे निशांत भाई , सुबुद्ध महिला संघटनेचे संतोष झामरे, मंगेश भोंगाडे अविनाश खांडेकर रामदास खडसे देवेश शर्मा राजेंद्र सोळंकी शिरीष चिकाटे प्रमोद गुंडतवार सुबुद्ध दातीर हे उपस्थित होते तर यांच्या सह ३५ लोकांच्या नावे व सहीसह निवेदनावर सही केल्या गेली व हे निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad