दहावी व बारावीच्या परीक्षेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातून टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांचा संजय खाडे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड,वणी बँकेत हा सत्कार सोहळा पार पडला. शालू सुनील बन्सल, आरती दिलीप गोबाडे, वैभवी विजय महाकुलकार, अमिषा अंकुश पारोधे, तेजस्विनी राजू गव्हाणे, यशश्री रंजीत कोडापे, काजल उमेश कोच्चर, विश्वद्या राजू पचारे इत्यादी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय खाडे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला डॉ. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, संगीता खाडे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या