Type Here to Get Search Results !

शिवजयंती आयोजक मंडळांचा सत्कार सोहळा

वणी : दि. १९ फेबृवारी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत जयंती दिवस.हा दिवस भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर अत्यंत उत्साहात साजरा केल्या जात आहे.महाराष्ट्रात तर या दिवसाला उत्साहाचे जणु उधाण आलेले असते. शिवजयंती उत्सव आता मनोरंजन, सांस्कृतिक, वैचारिक अशा विविध पद्धतीने साजरा होतो आहे.एक प्रकारे हा आता लोकउत्सव झाला आहे.
      ह्याच शिवजयंती उत्सवाचे ऐतिहासीक महत्व लक्षात घेऊन मराठा सेवा संघाचे वतीने वणी,मारेगांव,झरी तालुक्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांचा भव्य  सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.संत तुकाराम महाराज स्मृतिदिनाच्या औचित्याने दि.९ मार्च रोज शनिवारला दुपारी २:३० वाजता कुणबी समाज सांस्कृतिक भवन, साधनकरवाडी, वणी येथे हा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड वणी, मारेगांव, झरी तालुका यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्कार सोहळ्यास साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, वक्ते नंदकुमार बुटे, यवतमाळ हे प्रमुख मार्गदर्शन करतील. मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर हे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणुन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे वणी अध्यक्ष अंबादास वागदरकर, मारेगांव अध्यक्ष ज्योतिबा पोटे,झरी अध्यक्ष केतन ठाकरे, जिजाऊ ब्रिगेड वणी अध्यक्ष भारती राजपुत,मारेगांव अध्यक्ष लिना पोटे,राम कृषी केंद्राचे संचालक नितेश ठाकरे आणि अश्विनी चांदणे ह्या उपस्थित असतील.
         १९ फेबृवारी हा शिवजयंती उत्सव वणी,मारेगांव,झरी तालुक्यात साजरा करणाऱ्या आणि  नोंदणी झालेल्या मंडळ तथा आयोजकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहेत.करिता नोंदणी केलेल्या संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी,शिवप्रेमी नागरिकांनी आणि मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने संभाजी ब्रिगेड वणी  अध्यक्ष सचिन रासेकार,मारेगांव अध्यक्ष लहु जिवतोडे आणि झरी अध्यक्ष आशीष झाडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad